|सहकारनामा|
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस जवळ अज्ञात चार जणांनी ते पोलीस असल्याचे भासवून एसटीबस अडवून एसटी बस मधील प्रवाशांची सुमारे 1 कोटी 12 लाख 36 हजार रुपयांची रोकड आणि ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात भादवि 392,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची फिर्याद हितेंद्र बाळासो जाधव (वय 29 , व्यवसाय- खाजगी नोकरी, रा.वाघोशी, ता.फलटण, जि.सातारा) यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार दि. 03ऑगस्ट रोजी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पाटस जवळील ढमाले वस्ती येथे अज्ञात चार इसमांनी त्यांचे कडील मोटारसायकल वरून येवुन फिर्यादी प्रवास करत असलेल्या एस.टी बस ला इशारा करून थांबवत आम्ही पोलीस आहोत, तुम्ही दोन नंबरचा धंदा करताय अशी आम्हाला माहिती मिळाली आहे असे सांगुन एस.टी बसमधुन फिर्यादी व इतर तिघांना खाली उतरवुन आम्हाला या सर्वांना बाजुला असलेल्या सर्विस रोडवर नेवुन त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम व मेटल पार्सल असा ऐवज घेऊन विक्रम मोहन ढमाले यांचे घरासमोर सोलापुर-पुणे हायवे रोडलगतचे सर्विस रोडवर फिर्यादी व इतर व्यक्तींना हाताने व काठीने मारहाण करून व आणखी मारहाण करण्याचा धाक दाखवुन चोरून नेला आहे.
संशयित इसमांपैकी एक इसम शरीराने धिप्पाड, उंच, रंगाने काळा, नाक सरळ, चेहरा उभा, डोळे मोठे, अंगामध्ये काळे रंगाचे जर्किंन, खाकी पॅंन्ट व हातात फायबरची लाठी असलेला. दुसरा इसम मध्यम शरीर यष्टी, अंगावर खाकी रंगाची कपडे असलेला कमी उंचीचा. तिसरा इसम मध्यम उंचीचा गोल चेहरा असलेला व चैथा इसम मध्यम शरीर बांधा असलेला वर्णाचे होते. हे चोरटे मिळून आल्यास फिर्यादी त्यांना ओळखू शकतात.
घडलेल्या घटनेमध्ये आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे असलेले 26,00,000/-रू. (सव्वीस लाख रूपये) त्यात 2000रू दराच्या 200 नोटा व 500 रू.दराच्या 4400 भारतीय चलणाच्या नोटा, 10000/- रू. किमतीचा सॅमसंग कंपनीचा एम 30 माॅडेलचा ग्रे रंगाचा मोबाईल,
तेजस धनाजी बोबडे यांच्याकडे असलेली 25,62,570/-रू. (पंचवीस लाख बासष्ठ हजार पाचशे सत्तर) त्यात 2000 रू दराच्या 131 नोटा, 500 रू.दराच्या 4600 नोटा 100 रू दराच्या 5 नोटा, 10 रू दराच्या 7 नोटा, 29,49,860/-रू. (एकोणतीस लाख एकोणपन्नास हजार आठषे साठ) त्यात 2000 रू दराच्या 200 नोटा, ल500 रू दराच्या 5000 नोटा,100रू. दराच्या 498 नोटा, 50 रू दराची 1 नोट, 10 रू दराची 1 नोट दराच्या भारतीय चलनाच्या नोटा विकास जनार्दन बोबडे यांचे कब्जातील बॅगमध्ये असलेली, 1,15,000/-रू.किमतीचे मेटल पार्सल विकास जनार्दन बोबडे यांचे कब्जातील बॅगमध्ये असलेले 30,00,000/-रू. (तीस लाख) त्यात 500 रू. दराच्या 6000भारतीय चलनाच्या नोटा व 150 ग्रॅम वजनाचेमेटलपार्सल संतोश मनोहर बोबडे यांचे कब्जातील बॅगमध्ये असलेली असा एकूण 1 कोटी 12 लाख 36 हजार 860 रुपयांची रोकड लंपास केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अधिकारी डी.वाय.एस.पी धस, यवत पोलीस ठाण्याचे पो.नि. भाऊसाहेब पाटील, पोसई नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.