दौंड : दौंड तालुक्यात 12 ठिकाणी चोरी करणारी 6 जणांची टोळी अखेर जेरबंद करण्यात यवत पोलीसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून 7 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १७/०५/ २०२१ रोजी रात्री ११:०० ते १८/०५/२०२१ रोजी सकाळी ०९:३० च्या दरम्यान बोरीऐंदी (ता. दौंड) येथील दौंडकर मळा शेत जमीन गट नं.८० मध्ये मोकळे रानात असलेली डीपी तसेच कासुर्डी गावच्या हद्दीमध्ये बाळासाहेब जयवंत भोंडवे यांचे शेतातील डीपी अशा दोन डीपी कोणीतरी अज्ञात चोरट्याने नट बोल्ट खोलून त्यातील १६० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याबाबत यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक १५/१०/२०२१ रोजी यवत पोलीस स्टेशनच्या पथकाला एक संशयीत ओमीनी गाडी चौफुला बाजूकडून शिरूर बाजूकडे जाताना दिसली. या गाडीचा पोलीस पथकाने पाठलाग करून पारगाव गावच्या हद्दीमध्ये गाडी व त्यातील दोन इसमांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या इसमांनी त्यांचे इतर साथीदारांच्या मदतीने बोरीऐंदी, कासुर्डी, बोरीभडक,नानगाव, खुटबाव, कानगाव, उंडवडी, मिरवडी या ठिकाणच्या तब्बल १२ रोहित्र (डीपी) ची चोरी केल्याचे कबुल केले.
चोरीचा गुन्हा करताना १) लखन रमेश दोरके (वय २७ रा.समतानगर राहू ता.दौंड ) २)सचिन बबन बरडे (रा.राहू वाकण वस्ती, मुळ रा.वैजापूर स्वस्तिक टॉकीज जवळ जि.औरंगाबाद) ३) इसराक इर्शाद अली (वय ३८रा.शिक्रापूर चाकण रोड CNG पंपा समोर ता.शिरूर जि.पुणे, मुळ रा.कन्हारिया बुजुर्ग ता.महाराजगांज जि. लक्ष्मीपुर उत्तरप्रदेश) ४) निवृत्ती उर्फ मामा श्यामराव खळदकर (वय ३२ रा.नानगाव ता.दौंड जि.पुणे) ५) अक्षय सूर्यकांत उर्फ सुरेश खळदकर (वय २४ रा.नानगाव ता.दौंड जि. पुणे) ६) सुरज प्रकाश जाधव (वय २३ रा.नानगाव ता.दौंड जि. पुणे) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून ७ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पो.हवा.निलेश कदम, पो. हवा.गुरू गायकवाड, पो.ना.महेंद्र चांदणे,
पो.ना. रामदास जगताप, पो. ना. विकास कापरे, पो. ना.रविंद्र गोसावी, पो.ना. मेघराज जगताप, पो. शि. मारुती बाराते, पो. शि. निखिल रणदिवे, पो. शि. शिवाजी बोठे यांनी केलेली आहे.