मुंबई : आर्यन खान आणि इतरांना एनडीपीएस च्या विशेष न्यालायने आज जामिनास नकार दिला. त्यानंतर महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी Ncb आणि राजकीय पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत.
नवाब मलिक यांनी एनडीपीएस च्या विशेष न्यालायने जामिन नाकारला या विषयावर बोलताना न्यायालयात जज साहेबांसमोर जो युक्तिवाद झाला त्या आधारे हा निर्णय झाला आहे. पहिल्या दिवसापासून Ncb कडून युक्तिवाद बदलला जात आहे. इलेक्ट्रॉनिक एव्हीडन्स दाखवून नवनवीन पुरावे दाखवत युक्तिवाद केला जात आहे आणि त्यातून करून जामिन कसा थांबवला जाईल हे Ncb सध्या पाहत आहे. मात्र काही लोकांना जामिन मुळवून देण्यासाठी मदत करायची ही पद्धत Ncb अवलंबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ड्रग्स केसबाबत बोलताना मलिक यांनी हि केस फेक आहे, यात काही तथ्य नाही. यात दाखवले जाणारे ड्रग्स, गोळ्या पॉकेट यांचे फोटो हे समिर वानखेडे यांच्या ऑफिसमधील आहेत. जर यावर एखादे कोर्ट कमिशन चौकशीसाठी नेमले तर यात पूर्णपणे सत्य समोर येऊन हे सिझ केलेले ड्रग्स नाही तर यांनी स्वतः बनावट फोटो प्रसिद्ध करून हि केस दाखल केल्याचे सिद्ध होईल असे म्हटले आहे. आणि जे या प्रकरणातील आरोपी आहेत त्या आरोपींच्या वकिलांना जर पुराव्यासाठी काही मदत हवी असेल तर आम्ही निश्चितच त्यांना ती करू. Ncb ने गेल्या एक वर्षामध्ये ज्या केसेस केल्या आहेत त्यातील 90% केस बनावट आहेत आणि याबाबत आम्ही पुरावे गोळा करत असून आज ना उद्या ते समोर येईल. हे सर्व बनावट आहे, यात राजकारण असून काही पक्षांकडून विशेष लोकांना त्रास देण्यासाठी Ncb चा वापर केला जात आहे. यांना दहशत निर्माण करायची असून पैसे उकळण्याचे काम मुंबई शहरात Ncb कडून सुरू आहे.
एप्रिल महिन्यात याबाबत वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून यात वानखेडे यांच्या नावाने पैसे मागितले जात असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.