मुंबई : आर्यन खान याची बोटीवरील ड्रग्स पार्टी प्रकरण अजून ताजे असतानाच पुन्हा एकदा मुंबईमध्ये मोठ्याप्रमाणात ड्रग्स पकडण्यात आले आहे.
हि कारवाई मुंबई मधील सायन (शीव) (sion) भागात करण्यात आली आहे. यात मुंबई पोलीसांनी ड्रग्स विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक केली असून हि कारवाई अँटी नारकोटिक्स सेल विभागाने केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या महिलेकडे जवळपास सदर 7 किलो ड्रग्स ज्याची किंमत 22 कोटी रूपये इतकी असून ते या महिलेकडून जप्त करण्यात आले आहे.
आरोपी महिलेवर मुंबई पोलीसांनी NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती वृत्तपत्र एजन्सी ANI कडून देण्यात आली आहे.
Mumbai police said its Anti Narcotics Cell has arrested a woman drug peddler in Sion area and recovered 7 kilogram heroin worth Rs 22 crores.
— ANI (@ANI) October 20, 2021
A case has been registered under NDPS Act against the accused, Police added.