100 कोटींचा घोटाळा बाहेर आला तर गृहमंत्री गायब, आता 25 हजार कोटींची घोटाळा बाहेर आलाय आता नंबर कोणाचा : चित्रा वाघ यांचा सवाल

मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलेच राजकीय द्वंद्व पेटलेले दिसतेय. एका बाजूने आरोप करायचा आणि दुसऱ्या बाजूने तेवढ्याच ताकदीचे उत्तर ऐकायचे असा साधारण येथील जनतेचा दिनक्रम बनला आहे.
भाजप महिला आघाडीच्या व्हाईस प्रेसिडेंट चित्रा वाघ यांनी आता पुन्हा महाविकास आघाडीवर 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याची तोफ डागली असून त्यांनी ट्विटद्वारे 100 कोटींचा घोटाळा बाहेर आला तर गृहमंत्री गायब, आणि आता…25 हजार कोटींचा घोटाळा बाहेर आलाय आता नंबर कुणाचा ??? म्हणजे कोण गायब होणार असा खोचक सवाल करुन बीएमसी च्या रस्त्यांच्या कामात 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे.


चित्रा वाघ यांनी मुंबईत 25 हजार कोटींचे रस्ते बनले पण रस्ते कोणते आहेत. खड्डे कुठे बुजवले, कंत्राटदार कोण आहे, याचा तपशील बीएमसी ने मांडलाच नाही. बीएमसी कोणाला पाठीशी घालतेय. जनतेच्या पैशावर डल्ला मारणा-या “ठग्ज ॲाफ बीएमसी‘ ला कोण वाचवतंय? याबाबत चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.