भिगवण : मंदीराची दान पेटी आणि शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरणारे चोरटे जेरबंद करण्यात भिगवण पोलीसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १८/१०/२०२१ रोजी रात्री ७:३० ते ८:०० वा.चे दरम्यान मदनवाडी हद्दीतील सकुडे वस्ती येथील महादेव मंदीराचे पोर्चमध्ये ८ रुपये किंमत असलेली लाकडी दानपेटी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली होती. त्याबाबत भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या अगोदर दिनांक. १७/०९/२०२१ रोजी रात्री ८:०० ते दिनांक. १८/०९/२०२१ रोजी सकाळी ०८:०० च्या सुमारास डाळज नंबर, २ गावचे हद्दीत असणाऱ्या भादलवाडी तलाव येथील शेतीच्या पाण्याच्या इलेक्ट्रक मोटारी मधील तांब्याचे ताराचे ४८ हजारांचे वायडींग कोणीतरी अज्ञात
चोरटयाने चोरून नेले होते. त्याबाबतही भिगवण पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचे दोन्ही गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे धार्मिक भावनेशी निगडीत असल्याने पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सदर गुन्हे उघडकिस आणणेच्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन व सुचना दिल्या होता. त्याअनुशंगाने भिगवण पोलीस स्टेशन येथे विशेष पथकाची स्थापना करून ग्रामसुरक्षा दलाचे जवान मदतीस घेवुन अज्ञात आरोपीचा शोध सुरू होता. आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस पुणे-सोलापुर रोडने पेट्रोलींग करीत होते त्यावेळी डाळज नंबर. २ या गावचे हद्दीमध्ये पुणे सोलापुर रोडने एका मोटार सायकल वरून दोन इसम पोत्यामध्ये काहीतरी घेवुन जाताना पोलीसांना दिसले. यावेळी पोलीस त्यांना पकडत असतानाच ते मोटार
सायकल सोडुन पळुन जावु लागले यावेळी पोलीसांनी ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने त्यांना पकडुन ताब्यात घेतले. पोलीसांनी त्यांचेकडे सखोल विचारपुस केली असता त्यांनी अगोदर उडवाउडविची उत्तरे दिली मात्र पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी आम्ही मदनवाडी येथील मंदीरामधील दान पेटी चोरी केली असल्याचे सांगितले त्यामुळे त्यांच्या पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये मदनवाडी येथील महादेव मंदीरामधील चोरीस गेलेली दान पेटी मिळुन आली.पोलीसांनी त्या चोरटयांकडे अधिक तपास केला असता त्यांनी त्या परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांचेकडुन एक पल्सर मोटार सायकल व गुन्हयातील चोरीस गेलेला मुदमाल
असा एकुण १ लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हे आरोपी नातेपुते, फलटण, बारामती, या भागात गुन्हे केल्याचे सांगत असुन अधिक तपास चालु आहे. सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांच्यावर यापुर्वी बारामती शहर व तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी १) राजेंद्र तुकाराम मोटे, (वय.२४ वर्ष, रा.मेखळी, ता.बारामती,जि.पुणे) यास दिनांक १९/१०/२०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. त्यास मा. न्यायालयामध्ये हजर केले असता त्यास दिनांक २१/१०/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. त्याचा साधीदार हा विधीसंघर्ष प्रस्त बालक असून त्यासही ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही डॉ.अभिनव देशमुख, (पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण) मिलींद मोहीते (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक, विनायक दडस पाटील, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार समीर करे, विजय लोडी, अतुल पठाण, नाना वीर, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, आप्पा भांडवलकर, होमगार्ड
लोंढे, पोलीस पाटील वणवे, पोलीस मित्र अशोक सोळके ,रवी देवकाते व ग्रामसुरक्षा दल मदनवाडी यांनी केली आहे.