भिगवण :
मागील दोन दिवसापूर्वी घडलेल्या दरोड्याच्या प्रकारामुळे शेटफळगडे व लामजेवाडी येथील तरुणांनी पोलीस प्रशासन आणि ग्रामप्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गस्त सुरू केली लामजेवाडी येथे झालेल्या मोठ्या चोरीमुळे भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी दुसऱ्याच दिवशी शेटफळगडे येथे ग्रामसुरक्षा दल व ग्रामपंचायत यांच्या समन्वयाने गावांमध्ये मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये गावातील तरुणांनी ग्राम सुरक्षा दलामध्ये सहभागी होऊन पोलिस प्रशासनाला बरोबर आपल्या गावाचे संरक्षण कशा प्रकारे करावे याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, त्यामध्ये गावातील चोऱ्या, अवैध धंदे, तसेच इतर सर्व बाबींवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. यामुळे गावातील तरुणांनी एकत्र येऊन तसेच ग्राम प्रशासनाला विचारात घेऊन वाड्या- वस्त्यावर तसेच गावात गस्त सुरू करण्यासाठी सर्व तरुणांनी आठवड्यातील दिवसांचे सर्वानुमते वाटप करून गस्तीला सुरुवात केली. यामध्ये लामजेवाडी येथे असणाऱ्या तरुणांनी गस्तीच्या कार्याला त्वरित प्रतिसाद देत हा उपक्रम सुरू केला. यामुळे लामजेवाडी येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि गावातील नागरिकांनी या सर्व जणांचे मनापासून आभार मानले.