मुंबई :
अल्पसंख्याक विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहाराकरिता मिळणार रोख रक्कम मिळणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मासिक तीन ते साडेतीन हजार रुपयांची रक्कम हि त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
अ, ब आणि क वर्ग महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार ५०० रुपये तर जिल्हा व तालुकास्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार रुपये देण्यात येणार आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असून चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.