तालिबान ने महिलांना क्रिकेट खेळण्यास बंदी घातलेली नाही, मात्र.. – अफगाण क्रिकेट अध्यक्षांचा दावा

विदेश : तालिबान ने अफगाणिस्तानमध्ये महिलांना क्रिकेट खेळण्यास बंदी घातलेली नाही अशी माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (एसीबी) अध्यक्ष अजीजुल्लाह फाजली यांनी दिली असल्याचे दैनिक भास्कर ने आपल्या बातमीत म्हटले आहे.

फाजली यांनी याबाबत अधिक माहिती देताना तालिबानने महिलांना क्रिकेट खेळण्यावर किंवा इतर खेळांमध्ये भाग घेण्यावर कोणतीही अधिकृत बंदी नाही, मात्र त्यांना खेळादरम्यान धार्मिक तत्त्वे आणि पद्धतींचे पालन करावे लागेल आणि ते इतर संघांप्रमाणे फुटबॉल किंवा इतर खेळ खेळताना लहान कपडे घालू शकणार नाहीत असे फाजली यांनी म्हटले आहे.
फाजली यांनी अल जझीरा या टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यांनी दिलेल्या मुलाखतीत अफगाण-तालिबान सरकारने महिलांना कोणत्याही खेळावर अधिकृतपणे बंदी घातलेली नाही. विशेषत: जेव्हा क्रिकेटचा प्रश्न येतो तेव्हा ती आरामात या खेळात भाग घेऊ शकते.
क्रिकेट आणि इतर खेळांवर विचारलेल्या दुसर्‍या प्रश्नावर, फाजली म्हणाले की तालिबानच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. टी -20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या आमच्या संघाची तयारीही चांगली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.