पुणे / हडपसर :
नातेवाईकांना भेटायला गेल्याचा फायदा घेऊन बंद घर फोडून त्या घरातील तब्बल 17 तोळे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना (विधी संघर्ष बालक) हडपसर पोलीसांनी अवघ्या 10 तासांत मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे 10 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रोहित रामकिसन केंडे (वय ३४ वर्षे धंदा नोकरी रा. लेन नं. 14, मल्हार बिल्डींग दुसरा मजला फुरसुंगी पुणे) हे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी कोल्हापुर येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते.
ते नातेवाईकांना भेटून दि. 11 ऑक्टोबर रोजी रात्रौ 12:30 वाजता फुरसुंगी येथे आपल्या राहत्या घरी परत आले. त्यावेळी त्यांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलुप कशाचे तरी साहाय्याने तोडुन आत प्रवेश करुन सोन्याचे दागीने घरफोडी चोरी करुन नेली असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी अज्ञात चोरट्याविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.
हडपसर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकातील अधिकारी हनुमंत गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक, सौरभ माने, पो.उप.निरीक्षक पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, शाहिद शेख, निखील पवार, प्रशांत दुधाळ यांनी घटनास्थळी जावून आजुबाजुच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही फुटेज पाहून त्याआधारे संशयीत आरोपी यांची देहबोली निष्पन्न केली आणि त्याआधारे संशयीत आरोपीत इसमांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शशिकांत नाळे आणि अविनाश गोसावी, यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मल्हार बिल्डींग, फुरसुंगी येथे घरफोडी चोरी करणारे दोन मुले ही अपेक्षा लॉन्स, फुरसुंगी ब्रिजजवळ, हडपसर पुणे येथे निळ्या रंगाच्या मायस्ट्रो मोपेड गाडीवरुन येणार आहेत तसेच त्यांच्याकडे चोरीचे दागिने आहेत. अशी बातमी मिळाल्याने सदर माहिती प्रमाणे त्यांनी अपेक्षा लॉन्स, फुरसुंगी येथे तपासपथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या दोन टिम करत सापळा रचण्यात आला. काही वेळात माहिती मिळालेले दोन इसम हे निळ्या रंगाच्या मायस्ट्रो मोपेड गाडीवरुन येत असताना दिसले तेंव्हा त्यांना पोलीस स्टाफचे मदतीने पाठलाग करुन पकडण्यात आले. सदर मुलांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारले असता ते वयाने लहान असल्याचे निष्पन्न झाल्याने तेथे विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या पंचाना बोलावुन अंगझडती घेतली असता त्यांचेकडे सोन्याचे दागीने मिळूल आले.
सोन्याचे दागिन्याबाबत त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, आम्ही दोघांनी मिळुन मल्हार बिल्डींग येथील दुस-या मजल्यावरिल घराचे दिवसा कुलुप तोडुन आतमध्ये प्रवेश करुन सोन्याचे दागिने चोरुन ते आपसात वाटुन घेतल्याचे सांगितले.
नमुद विधिसंघर्षित बालक यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेले दागीन्यापैकी 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागीने किं.रू 10 लाख 25 हजार चे 24 तासाच्या आत जप्त करून दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे. नमुद विधिसंघर्षित बालक यांच्याकडून गुन्ह्याकरीता वापरलेली मोपेड,
अॅपल फोन जप्त करण्यात आलेला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सौरभ माने, पोलीस उप निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री. कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन,पुणे शहर, पोनि.(गुन्हे) श्री. राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) श्री. दिगबंर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.