|सहकारनामा|
दौंड : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधित मार्शल आर्ट बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कूल च्या वतीने दौंड मध्ये घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट स्पर्धेत येथील युवा खेळाडूंनी आपली छाप पाडली. मोठ्या गटात आयुष कनोजिया व लहान गटात प्रणव तलंगे यांनी बाजी मारली. तसेच मोठ्या गटात सिद्धी लोटके तर लहान गटात संस्कृती शिंदे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेमध्ये तालुक्यातील 90 खेळाडूंनी भाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व विजेत्या खेळाडूंना नगराध्यक्ष शितल कटारिया व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी नगरसेविका अरुणा डहाळे, संस्कार स्कूल चे चेअरमन जयंत पवार, राजेंद्र साळवे, प्रा. दिलीप डहाळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन संतोष सोनवणे यांनी केले, कृष्णा आडागळे, हिरालाल साळवे, गणेश फुंडे यांनी परीक्षक म्हणून कामगिरी बजावली. श्रुती कटारिया, चेतन जरांडे, सागर रकटे, खुशी कटारिया, हर्ष पोकार, अभिनव काळे यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्र संचालन समृद्धी बंडगर हिने केले व प्रशांत खाडे यांनी आभार मानले.