Narayan Rane Arrest! नारायण राणे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!



|सहकारनामा|

रत्नागिरी : भाजप चे राज्यातील जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं समोर आलं आहे. राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिस त्यांना ताब्यात घेण्याबाबत हालचाल करीत होते. नारायण राणे यांच्या विरोधात पहिला गुन्हा नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर पोलिसांचे  पथक कोकणाकडे रवाना झाले होते. मात्र त्यास जास्त महत्व न देता नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला परंतु,  रत्नागिरी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मात्र त्यांना पोलीस ताब्यात घेऊन अटक करणार याबाबत राज्याचे लक्ष लागून होते. 

सध्या पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले असून त्यांना दिल्लीतून  मोठ्या नेत्यांनी फोन करून त्यांना आधार देत त्यांच्या सोबत असल्याचे व सांगत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.