वृत्तसंस्था : (सहकारनामा ऑनलाइन)
– डब्ल्यूएचओ या जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसबाबत एक इशारा दिला असून या इशारामध्ये असे सांगितले गेले आहे की उन्हाळ्यामुळे जीवघेणा कोरोना व्हायरस नष्ट होईल असे समजणे ही सर्वात मोठी चूक असेल त्यामुळे आता उष्णतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही हे मानणे आता चुकीचे ठरत असून या आरोग्य संघटनेनं कोविड-19 ची लागण झालेल्या सर्व देशांना याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, जर उष्णतेमुळे हा व्हायरस नष्ट झाला तर ते ईश्वराच्या वरदानासारखे असेल.
डब्ल्यूएचओचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर डॉ. माईक रायन यांनी शुक्रवारी जिनेव्हात म्हटले आहे की, कोविड -19 (कोरोना व्हायरस) च्या संसर्गाची क्षमता वाढत आहे आणि हे हंगामी इन्फेक्शन आहे आणि उष्णतेमध्ये आपोआप गायब होईल, असा आतापर्यंत एकही दाखला मिळालेला नाही.
आपली श्वसन प्रणाली प्रभावित करणारा फ्लू आणि इनफ्लुएंजा सारखा संसर्ग मोसमी असतो आणि उन्हाळ्यात त्याचा परिणाम खुपच कमी होतो. परंतु, कोविड-19 (कोरोना व्हायरस) बाबत असे बोलता येणार नाही.
कोविड-19 बाबत अमेरिकन तज्ज्ञांनी म्हटले होते की, हा जीवनघेणा व्हायरस उन्हाळ्यात आपोआप गायब होईल. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या डायरेक्टर डॉ. नैंसी मेसोनियर यांच्यानुसार फ्लू आणि इनफ्लुएंजा सारखे श्वसन प्रणालीला संसर्ग करणारआजारात असे दिसते की उन्हाळ्यात ते गायब होतात. यामुळे अशी आशा करता येऊ शकते की, कोविड-19 जुलैपर्यंत नष्ट होईल. परंतु, डब्ल्यूएचओने सीडीसीच्या या मताचे जोरदार खंडन केले आहे.
यापूर्वी सोमवारी डब्ल्यूएचओने म्हटले होते की, आतापर्यंत कोविड-19 च्या व्यवहाराबाबत आम्हाला काहीही माहिती नव्हते. हा इनफ्लुएंजाच्या व्हायरससारखा नाही. हा वेगळा व्हायरस आहे, त्यामुळे तो कसा व्यवहार करतो हे ठोसपणे सांगता येणार नाही. डब्ल्यूएचओने चिंता व्यक्त केली आहे की, कोविड-19 साठी अनेक देशांची तयारी अर्धवट आहे. यामुळेच अमेरिका आणि इटलीसारख्या देशांमध्ये याचा परिणाम दिसून येत आहे. या देशांची आरोग्य व्यवस्था यासाठी पूर्णपणे तयार नव्हती.
आतापर्यंत जगभरात या जीवघेण्या व्हायरसची 1 लाख प्रकरणे समोर आली आहेत. सर्वात जास्त संसर्ग झालेल्या देशांमध्ये चीन, इराण, दक्षिण कोरिया आणि इटली यांचा समावेश आहे. अमेरिकेमध्ये 233 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत आणि 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात 33 रूग्ण सापडले असून 20 पेक्षा जास्त लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.