दौंडमधील त्या व्यक्तीचा आला ‛रिपोर्ट’, ‛या’ कारणामुळे दौंडकर मात्र त्रस्त



दौंड : सहकारनामा ऑनलाईन 

– दौंडमध्ये सध्या अफवांचे पीक जोर धरत असून याचा मोठा परिणाम पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेवर पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून दौंड शहरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोना झाला असल्याची अफवा पसरली होती त्यानंतर  त्याची तब्येत बिघडली असल्याची पुन्हा मोठी अफवा पसरली त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता त्यामुळे अखेर त्या व्यक्तीला पुण्यातील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येऊन कोरोना चाचणी करण्यात आली या चाचणीमध्ये ती व्यक्ती कोरोना निगेटिव्ह म्हणून जाहीर करण्यात आले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. दौंड तालुक्यामध्ये अश्या अनेकगावांमध्ये अफवांना जोर आला असून विविध प्रकारे हे महाभाग सोशल मीडिया आणि फोन कॉलचा सहारा घेऊन अफवा पसरवत असल्याचे समोर येत आहे. अश्या अफवा पसरविणाऱ्यांवर आता पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी तरच हे कुठेतरी थांबेल अशी मागणी जोर धरत आहे.