Coronavirus: ‛सौदी अरब’मधून दर्शन करून सांगलीत आलेल्या 4’कोरोना बाधितांसह त्या 14’जनांबाबत मोठी बातमी आली समोर



सांगली – सहकारनामा ऑनलाईन

– संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ माजविणाऱ्या इस्लामपूर मधील ‘त्या’ पहिल्या चार कोरोना बाधित रुग्णांसाह १४ जणांचे अहवाल आता निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे संपूर्ण सांगलीकरांचा जीव भांड्यात पडला आहे. पहिल्या कोरोना बाधितांसह संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी घेण्यात होती यामध्ये १४ जणांचे अहवाल (रिपोर्ट) निगेटिव्ह आले आहे.

इस्लामपूर येथील चौघेजण उमराह करण्यासाठी मक्का येथे गेले होते. ते उमराह करून परतल्यानंतर या चौघांना १९ मार्च रोजी शासकीय रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते या नंतर या चौघांची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती. कारण उमराह करून आल्याने ते आपल्या नातेवाईक आणि मित्रांना भेटले होते. त्याचा आकडा साधारण ४०० च्या आसपास सांगण्यात येत होता.  त्यामुळे प्रशासकीय यंत्रणाही हादरून गेली होती. त्यामुळे जे जवळील लोक त्यांच्या संपर्कात आले होते त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यातील काहींना डॉक्टरांच्या देखरेखीखाली तर काहींना त्यांच्या घरातच विलगिकरण करून ठेवण्यात आले होते.

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष म्हणजे यामध्ये एक महिला आणि तिच्या दोन वर्षाच्या बाळासह एका लहान मुलीचा समावेश होता. 

एकूण २६ जणांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. सुखद बाब म्हणजे मक्केवरून उमरा करून जे पहिले चार जण आले होते. त्यांचा ४ एप्रिल रोजी १४ दिवसांचा उपचारांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्यामुळे आरोग्य विभागाकडून त्यांची चाचणी घेण्यात आली.त्यामध्ये या चौघांचेही अहवाल निगेटिव्ह आले. साधारण एक दिवसानंतर त्यांची पुन्हा आणखी एक टेस्ट घेण्यात येईल आणि ती टेस्टही निगेटिव्ह आली तर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच या चौघांच्या संपर्कात आलेल्या त्या ११ जणांचीही चाचणी घेण्यात आली होती त्यामध्ये तब्बल १० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे अगोदर बाधित झालेल्या चौघा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेल्यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्व सांगलीकरांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे.