दौंड : सहकारनामा ऑनलाईन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याकडून मास्क, सॅनिटाईजर, ग्लोज आणि फेसशिल्ड मास्क चे वाटप करण्यात आले आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी यामध्ये अविरतपणे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आहे. दौंड तालुक्यामध्ये दौंड उपजिल्हा व यवत ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर, नर्सेस व कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील तसेच खाजगी डॉक्टर्स हे सर्व कर्मचारी आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता तालुक्याच्या सेवेसाठी झटत आहेत. या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे या हेतूने त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक वस्तूंचे आज वाटप करण्यात आले आहे. याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी बोलताना हे कर्मचारी तालुक्याची काळजी घेत असताना त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक ते साहित्य त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी व माझ्या सहकाऱ्यांनी केला आहे. आज दिलेल्या वस्तू पुढील काळात देखील अधिक गरज पडल्यास त्या अधिकारी व कर्मचारी यांना उपलब्ध करून देणार असल्याचे ही आमदार कुल यांनी वाटपा वेळी सांगितले. तसेच सद्यस्थितीत दौंड तालुक्यात एकही कोरोना संशयित रुग्ण अद्याप सापडला नसल्याने भीतीचे कारण नाही. याला आपण घेतलेल्या बैठका व कर्मचारी वर्गनी घेतलेली मेहनत हेच कामाला आले असुन तरीदेखील नागरिकांनी स्वतःची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असेही आमदार कुल यांनी सांगितले.