खामगाव येथील दारूभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, गावठी दारूसाठा नष्ट



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

 – खामगाव (ता.दौड) येथील अवैध गावठी हातभट्टी निर्मिती करत असलेल्या ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत जोरदार कारवाई केली.यावेळी दारु वाहतुक करणारे वाहन क्रमांक एमएच १२-जेएफ १५२८ हे पोलिसांनी ताब्यात घेत ६५०० लिटर दारु निर्मिती करणारे रसायन,३०० लिटर तयार गावठी दारु जाग्यावर नष्ट करण्यात आली असल्याची माहिती दुय्यम निरिक्षक दत्तात्रय माकर यांनी दिली.या ठिकाणी मागील आठवड्यात यवत पोलिसांनी छापा टाकला होता मात्र पुन्हा गावठी दारु निर्मिती करण्यात येत होती.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपविभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे,अधिक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.२०)रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हाभर केलेल्या कारवाईत एकुण तेरा गुन्हे दाखल करण्यात आले असुन सुमारे ५६०३५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. खामगाव येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिली होती. ऐ.डी.काजळे,डि.एस.जानराव,टि.बी.शिंदे,सी.एस.रासकर आदिनी कारवाईमध्ये भाग घेतला महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या  कलम १३३,१३४ अन्वये पोलीस पाटील,स्थानिक तलाठी तसेच पदाधिकारी यांनी अवैध दारू विक्री तसेच निर्मिती बाबतची माहिती पोलिसांना देण्याबाबतचे पत्र देण्यात आले.यावेळी खामगाव सरपंच मंगल नेटके,पोलिस पाटील सौ.एस. जगताप,आदी उपस्थित होते.