जमिनीच्या ताब्यावरून केडगावमध्ये तुफान हाणामारी, नऊ जणांवर गुन्हा दाखल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील केडगावमध्ये असणाऱ्या धुमळीचामळा येथे जमिनीच्या जुन्या वादातून पुन्हा एकदा तुफान हाणामारी झाली आहे. या प्रकरणी सुनील गायकवाड (रा.धुमळीचामळा केडगाव) यांनी फिर्याद दिली असून बेकायदा जमाव जमवून मारहाण केल्या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुनील गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.२३ एप्रिल रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास आरोपी हे फिर्यदिस म्हणाले की तुम्ही राहत असलेल्या जागेचा ताबा मला हवा आहे, त्यावेळी फिर्यादीने सदर बाबत कोर्टामध्ये केस चालू असून निर्णय झाल्यानंतर पाहू असे उत्तर दिल्याचा राग मनात येऊन आरोपींनी बेकायदा जमाव जमवून फिर्यदिस बेदम मारहाण केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी अधिक तपास यवतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कापरे करत आहेत.