दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील केडगावमध्ये असणाऱ्या धुमळीचामळा येथे जागेच्या जुन्या वादातून बेकायदा जमाव जमून तुफान हाणामारी झाली होती. काल याबाबत सुनील बाळासाहेब गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी एकनाथ विश्वनाथ गायकवाड, अमोल एकनाथ गायकवाड, पंढरीनाथ विश्वनाथ गायकवाड, नवनाथ पंढरीनाथ गायकवाड, विजय विश्वनाथ गायकवाड, रोहित विजय गायकवाड, मयुर विजय गायकवाड, अक्षय राऊत व तेजस्वीनी नवनाथ गायकवाड असे सर्व रा. धुमळीचा मळा, केडगाव ता.दौड जि.पुणे अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तर याच मारहाण प्रकरणी आज नवनाथ पंढरीनाथ गायकवाड यांनी फिर्याद दिली असून यवत पोलिसांनी सुनिल बाळासो गायकवाड, शरद बाळासो गायकवाड, बाळासो तुकाराम गायकवाड, अलका बाळासो गायकवाड, अर्चना सुनिल गायकवाड, पुजा शरद गायकवाड, तुकाराम मारूती गायकवाड, इंदुबाई तुकाराम गायकवाड सर्व रा.केडगाव, धुमळीचा मळा ता. दौंड जि.पुणे या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे दोन्ही गटांत झालेल्या मारहाण प्रकरणी एकूण १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मारहाण प्रकरणातील प्रथम फिर्यादी सुनील बाळासाहेब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आपल्या कुटुंबियांशी घरासमोरील ओट्यावर रात्री ९:३० ला एकमेकांशी गप्पा मारत बसले असताना त्यांच्या घराच्या उत्तरेस रहाण्यास असलेले त्यांच्या भावकितील एकनाथ विश्वनाथ गायकवाड व त्यांचा मुलगा अमोल एकनाथ गायकवाड असे दोघे आले. त्या दोघांपैकी एकनाथ विश्वनाथ गायकवाड यांनी शरद कुठे गेला आहे असे विचारले त्यावेळी मी त्यांना तुमचे शरदकडे काय काम आहे असे विचारले असता तुम्ही रहात असलेल्या खोल्यांचा ताबा आम्हाला हवा आहे असे म्हणाले त्यावेळी मी त्यांना आपली यापुर्वी
कोर्टामध्ये केस दाखल झालेली आहे त्या केसचा निकाल लागल्यानंतर आपण पुढे काय होईल त्यावर निर्णय घेवु असे म्हणालो असता तेवढयात तिथे आमचे पंढरीनाथ विश्वनाथ गायकवाड, नवनाथ पंढरीनाथ गायकवाड, विजय विश्वनाथ गायकवाड, रोहित विजय गायकवाड, मयुर विजय गायकवाड, अक्षय राऊत, सौ.तेजस्वीनी नवनाथ गायकवाड असे सर्वजण संगणमत करून एकत्र जमाव जमवुन आले व पंढरीनाथ विश्वनाथ गायकवाड व इतर सर्वांनी शिवीगाळ करत हाताने तसेच लाथा बुक्कयांनी पोटात, छातीमध्ये मारहाण केली त्यावेळी रस्त्याच्या पुलावर असलेल्या शेजाऱ्यांनी येऊन आम्हाला सोडवले तयावेळी घडलेल्या घटनेबाबत मी तक्रार देण्यासाठी केडगाव पोलीस स्टेशनला जात असताना मला नवनाथ पंढरीनाथ गायकवाड हा मला म्हणाला की तु चौकीला जा नाहीतर कुठेही जा मी सर्व मॅनेज केलेले आहे तुझे घरदारच संपवतो असे बोलुन धमकी दिली असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे तर नवनाथ पंढरीनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.२३ एप्रिल रोजी रात्री ९:०० वाजनेच्या सुमारास त्यांचा चुलत भाऊ मयुर विजय गायकवाड हा दुध डेअरी मध्ये दुध घालण्यास जात असताना त्यांच्या भावकितील शरद बाळासो गायकवाड यांचा बोरचे पाण्याचा पाईप रोडवर आडवा असल्याने मयुर याने त्यांचे पाईपावरून गाडी घेवुन दुध डेअरी मध्ये गेला होता. यानंतर तेथे शरद बाळासो गायकवाड याने दूध डेअरीपाशी येवुन मयुर यास शिवीगाळ करत तुझा भाऊ नव्या कोठे गेला असे विचारले त्यावेळी त्याने भाऊ घरी आहे. मला कशाला शिव्या का देतो माझे लक्षात आले नाही तेथे तुमचा पाईप आहे मी घाईत होतो असे म्हणाला त्यावेळी शरद गायकवाड हा नवनाथ गायकवाड याच्या घरी येऊन त्यांची पत्नी तेजस्वीनी हीस कुठे गेला तुझा भाडखाव नवरा त्याला खूप माज आहे. त्याचा माज जिरवायचा आहे. व तुमच्या सर्वाचा माज मोडतो आता मला वेळच वेळ आहे. असे म्हणुन तो नवनाथ याची पत्नी तेजस्वीनी हीस शिवीगाळ करून त्याच्या घरी निघुन गेला त्यानंतर नवनाथ याचे चुलते, चुलत भाऊ शरद गायकवाड याचे घरी तुम्ही आम्हास शिव्या का दिल्या हे विचारण्यास गेले असता तेथे सुनिल बाळासो गायकवाड हे त्यांचे मोबाईल मध्ये शुटिंग काढत होते आणि त्यांचे घरातील लोक बेकायदेशीर जमाव जमवुन आमचे कुटुंबास शिव्या देत होते. यावेळी बाळासाहेब गायकवाड म्हणाले की एवढया दिवस मार खात होता आता शिव्यांनी काय भोक पडतात का त्यावर माझा भाऊ रोहीत हा सुनिल गायकवाड यास म्हणाला की तु शुटिंग काढु नकोस तुम्ही असेच आमचे वर शुटिंग काढुन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. तरीसुध्दा सुनिल काही एक ऐकत नव्हता त्यावर रोहीत हा सुनिल यास म्हणाला
मोबाईल खाली ठेव असे म्हणत त्याचे जवळ गेला त्यावर सुनिलने माझा भाऊ रोहीत यास हाताने
मारहान केली व मी व आमचे घरातील सर्व लोक रोहीत यास सोडवण्यासाठी गेलो असता. अलका बाळासो गायकवाड ही घरातुनच लोखंडी चॅनल हातात घेवुन आली तो चॅनल सुनिल बाळासो गायकवाड याने त्यांचे आईचे हातातुन हिसकावुन घेवुन माझे डावे बरकडीस मारला व माझे डोक्यात चॅनल मारत असताना मी बाजुला झालो त्यांमुळे तो चॅनल माझे उजवे खांदयावर लागला. त्यानंतर मी घरी जात असताना मला सुनिल यांने दम दिला की वर ये तला मारूनच टाकतो त्यामळे घाबरून घरी थांबलो व आज रोजी तकार देण्यास आलो आहे असे नवनाथ गायकवाड यांनी आपल्या फिर्यादीमध्ये नमूद केले असून पोलिसांनी दोन्ही गटांवर बेकायदा जमाव जमवून मारहाण करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास यवतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कापरे करीत आहेत.