ग्रामपंचायतींना मासिक सभा घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

कोरोनाव्हायरसचा फैलाव होऊ  नये म्हणून लॉकडाउन सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातही जमावबंदी लागू करण्यात आहे. याचा परिणाम ग्रामपंचायतींच्या मासिक सभांवरही होऊन त्या सभा घेतल्या जात नव्हत्या. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलासादायक निर्णय घेत अटी व शर्तींच्या अधीन राहून ग्रामपंचायतींना मासिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सभेला सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सभा शक्‍यतो मोकळ्या जागेत घ्यावी, तोंडाला मास्क बांधावे, सोशल डिस्टन्स ठेवावे अशा अटी टाकण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायतीची मासिक सभा दर महिन्याला घेणे कायद्याने बंधनकारक असते परंतु कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून संचारबंदीचे आदेश पाळत मासिक सभा घेतल्या जात नव्हत्या मात्र आता त्या घेण्याची परवानगी देण्यात आली असून मासिक सभा घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक ती काळजी घेऊनच मासिक सभा घ्यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.