दौंडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची सात ठिकाणी धाड, 1 लाख 53 हजार रुपयांचा अवैध दारूसाठा नष्ट



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

कोरोना विषाणुचा पुणे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर फैलाव झाला असल्याने पुणे जिल्ह्यातील मद्याची सर्व दुकाने दि.२० मार्च २०२० ते पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात आलेली आहेत. याचाच गैरफायदा घेत पुणे जिल्ह्यात अवैधपणे हातभट्टी दारूची निर्मिती केली जात असून तिची वाहतूक व विक्री होत आहे. यावर कारवाई करण्यासाठी आता राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाही सक्रिय झाला असून पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी हातभट्ट्यांवर धाडी टाकून कारवाई केली जात आहे. सोमवार दि.२७ एप्रिल रोजी दौंड येथील गोवागल्ली, भाजीमार्केट, आलेगाव व गोळीबार मैदान या परिसरातील अशाच काही ठिकाणी हातभट्टी निर्मितीच्या अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या असून सात गुन्हे नोंदवून राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने मोठी कारवाई केलेली आहे. या ठिकाणांवर ७३०० लीटर हातभट्टी निर्मिती रसायन व ७५ लीटर तयार हातभट्टी असा एकुण १५३००० रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केलेला आहे. सदर कारवाई विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे व संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय मनाळे,

डि.एस.जानराव, अनिल बिराजदार तसेच डी.व्ही.माकर, ए.डी.काजळे, विकास थोरात व सतिष इंगळे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे व इतर कर्मचारी यांच्याकडुन करण्यात आलेली आहे.