पुणे : सहकारनामा ऑनलाईन
पुण्यामध्ये रात्री लाचलुचपत विभाग आणि लाचखोर पोलीस आधीकारी यांच्यात फिल्मी स्टाईल थरार पहायला मिळाला. लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाचा संशय येताच लाचेची रक्कम फेकून पोलीस आधीकारी कार घेऊन फिल्मी स्टाईलने पळून गेला असून लाच घेणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यावर मात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चेन्नईहून राजकोटला जाणार्या कंटेनरला सोडण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित रामचंद्र अधटराव (महामार्ग सुरक्षा पथक, वडगाव) या पोलीस अधिकाऱ्याने कंटेनर चालकाकडे लाच मागितली. तडजोडी अंती १५ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले मात्र कंटेनर चालकाने याची घाबर घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळविली या नंतर या विभागाने सापळा रचला. ठरलेल्या वेळी या अधिकाऱ्याने येऊन लाचेचे पैसे स्वीकारल्यानंतर त्याला संशय आला व तो आपल्या गाडीतून पळून गेला मात्र त्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे बालरोड लाइन्स यांचे गाडीवर चालक असून ते गाडीतून पवनचक्कीचे पाते घेऊन चेन्नईवरुन राजकोटला जात होते. तक्रारदार व त्यांचे सहकारी अशा २ गाड्या सत्यजित अधटराव याने पुणे मुंबई महामार्गावर उर्से टोलनाक्यावर अडवत दोन्ही वाहने लॉकडाऊन उठल्यानंतर नंतर सोडली जाईल असे म्हणत गाड्या सोडायच्या असतील तर प्रत्येक गाडीचे १० हजार रुपये असे २० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. चालकांनी लाच लुचपत प्रतिबंधिक विभागाकडे गुपचूप तक्रार केल्यानंतर वरील सर्व प्रकार घडला या प्रकरणी पोलिसांनी वडगाव पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.