दहिटने येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील नऊ जणांचे अहवाल झाले प्राप्त



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील दहिटने येथील वृद्धाला झालेल्या कोरोना संसर्गाने सर्वत्र खळबळ माजली होती. त्यामुळे त्या वृद्धाच्या संपर्कात आलेली २२ जणांची तातडीने कोरोना टेस्ट करण्यात आली होती. २२ पैकी ९ जणांचे अहवाल आत्ता प्राप्त झाले असून या नऊजणांची टेस्ट निगेटिव्ह आली असल्याची माहिती दौंडचे आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे. नऊजण निगेटिव्ह आल्याने दौंडकरांचा जीव भांड्यात पडला असून लवकरच अन्य १३ जनांचेही अहवाल प्राप्त होणार आहेत.