दौंड मधील आठ जवानांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील राज्य राखीव दलाच्या आठ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. 

राज्य राखीव दलाचे ११० जवान मुंबई येथे बंदोबस्तासाठी तैनात होते त्यांचा तेथील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर  त्यांची  ।मान्यताप्राप्त खाजगी लॅबमध्ये टेस्ट करण्यात आली होती मात्र यातील ८ जवान हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले असल्याची माहिती एमबीबीएस असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली सरवर खान यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना दिली.