takrar nivaran din – उद्या नागरिकांच्या तक्रारींचे होणार निवारण! यवत आणि दौंड पोलीस निरीक्षकांनी केले नागरिकांना ‛हे’ आवाहन



|सहकारनामा|

दौंड : यवत आणि दौंड पोलीस स्टेशन हदिद्तील नागरिकांच्या विविध तक्रारी आणि अडचणी लक्षात घेऊन उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या दिनांक 09/09/2021 रोजी सकाळी 09 ते 05 यावेळेत यवत आणि दौंड पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

ज्या नागरिकांचे पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज, पासपोर्ट, चारित्र पडताळणी तसेच मुद्देमाल प्रलंबित असतील अशा नागरिकांचे त्यांच्या तक्रारीबाबत गुरुवारी  सकाळी 09 ते 1 या वेळेत तक्रारीचे निरसण केले जाणार आहे. तसेच पासपोर्ट, चारित्र पडताळणी संदर्भात दु.2 ते 3 वेळेत या वेळेत तक्रारीचे निरसण केले जाणार आहे तर मुद्देमालाच्या तक्रारी संदर्भात दु.3 ते 5 या वेळेत तक्रारीचे निरसण केले जाईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

तरी सर्व नागरिकांनी तक्रार दिनानिमित्त ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी यवत आणि दौंड पोलीस स्टेशन येथे हजर रहावे असे आवाहन यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले आहे.