अनर्थ अटळ होता, पण आमदार राहुल कुल यांच्या त्या निर्णयाने अनेकांना ‛कोरोना’पासून तारले



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दौंडचे आमदार राहुल कुल यांनी प्रसंगावधान राखत १६ एप्रिल रोजी काही कडक निर्णय घेत त्याची अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणा करण्या संदर्भात सूचना केल्या होत्या. त्यामुळे दौंड तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट होण्यापासून वाचला आहे.

आमदार राहुल कुल यांनी राज्यराखीव दलाबाबत क्वारंटाईन चा निर्णय घेतला

आज शुक्रवारी सायंकाळी दौंड शहरातील राज्य राखीव पोलीस दलाच्या मुंबई येथे बंदोबस्ताला असणाऱ्या ८ जवानांना कोरोना झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येताच संपुर्ण दौंड तालुक्यात खळबळ उडून भीतीचे वातावरण निर्माण झाले. सबंधित जवानांच्या तुकड्या या मुंबई येथे आपले कर्तव्य बजावुन दौंड याठिकाणी माघारी येण्याअगोदर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी १६ एप्रिल रोजी सबंधित जवानांच्या आरोग्याच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना अलगीकरण गरजेचे असल्याने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वत: त्यांना अलगीकरण करण्याच्या ठिकाणाची पाहणी केली होती. 

राज्य राखीव दलातील आलेल्या तुकड्यांसाठी केलेल्या व्यवस्थेची आ.कुल यांकडून पाहणी

सबंधित जवान हे आणीबाणीच्या काळात कोरोना योद्धे बनुन त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे अलगीकरणा वेळी त्यांची कोणतीही गैरसोई होऊ नये म्हणुन सबंधित सर्व अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या त्यामुळे सबंधित जवान व्यवस्थित रित्या राहु शकले आहेत. हेच जवान मुंबईवरून आल्यानंतर जर आपले कुटुंब किंवा इतरत्र ठिकाणी वावरत राहिले असते तर मोठा अनर्थ घडला असता परंतु आमदार राहुल कुल यांनी वेळीच सर्व अधिकाऱ्यांना योग्य सुचना केल्याने हा अनर्थ टळला आहे.