नाशिक : सहकारनामा ऑनलाईन
शनिवार दि. ०२ मे रोजी उत्तर प्रदेशच्या ८४५ नागरिकांना विशेष रेल्वेने यूपीमधील लखनौ येथे पाठवण्यात आलं. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर विशेष १६ डबे असणाऱ्या गाडीने हे सर्व नागरिक सोशल डिस्टन्स पाळत आपल्या राज्यात रवाना झाले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. तर नाशिकच्या रहिवाश्यांनी या मजूर लोकांना टाळ्या वाजवून निरोप दिला.
कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले त्यामुळे अनेक मजूर आपल्या कुटुंबासह आपले सामान घेऊन पायी मुंबईहून यूपीच्या दिशेने निघाले होते. ते नाशिकमार्गे जात असताना त्यांना पोलिसांनी थांबवले होते या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार या राज्यातील नागरिकांचा समावेश होता. यासर्वांना नंतर शेल्टर कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश सरकारशी बोलून या शेल्टरमध्ये असलेल्या लोकांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करत त्यांना मायदेशी रवाना केले.