काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह 5 जवान शहीद, 2 दहशतवाद्यांचा खात्मा



वृत्तसंस्था :

काश्मीरमध्ये लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक होऊन यामध्ये लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद झाले. या वेळी दोन दहशतवाद्यांना मारण्यात लष्कराला यश आले.

ही घटना कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये घडली असून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये आठ तास ही चकमक सुरु असल्याचे ए.एन.आय ने वृत्तात म्हटले आहे.

ANI (@ANI) Tweeted

या चकमकीमध्ये २१ राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अशुतोष शर्मा यांचा समावेश असल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत मिळालेल्या वृत्तानुसार हंदवाडा भागात दहशतवादी घुसले असल्याची माहिती मिळाली होती. या ल्या भागातील लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे ५ जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक जवान अशा सहा जणांनी येथे प्रवेश केला आणि नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढत असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांना जवान आल्याचे समजताच त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरु केला. यावेळी जवानांनीही  प्रत्युत्तर देत हल्ला चढवला यावेळी दोन दहशतवादी ठार झाले तर दोन लष्करी अधिकाऱ्यांसह दोन जवान आणि एक जम्मू-काश्मीर पोलीस अधिकारी असे पाच जण शहीद झाले.