फुल उत्पादक शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या : आ.राहुल कुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

फुल बाजार समिती बंद असल्यामुळे फुलशेती करणारा शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे राज्यशासनाने फुल उत्पादक शेतकऱ्यांचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे



याबाबत आमदार राहुल कुल यांनी दिलेल्या पत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील प्रामुख्याने दौंड, हवेली व पुरंदर तालुक्यातील तसेच उर्वरित संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे फुलशेती करत आहेत. यातील बहुतांशी शेतकऱ्यांसाठी फुल हेच नगदी पिक असून उत्पनाचे प्रमुख साधन आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या तीनही तालुक्यात मिळून सुमारे ६० टक्के शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे अक्षरश: कंबरडे मोडले आहे असे या पत्रामध्ये नमूद करून तीनही तालुक्यातील बिजली, लिली, गुलछडी, झेंडू, गुलाब, कापरी तसेच पॉलिहाऊस मधील जरबेरा, कारनेशन, डचगुलाब फुले ही अशीच पडून आहेत फुल बाजार समिती बंद असल्यामुळे फुलशेती करणारा शेतकरी अडचणीत आला आहे त्यामुळे राज्यशासनाने फुल उत्पादक शेतकऱ्यांचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी या पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांकडे केली आहे. या पत्रांच्या अन्य प्रति विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे अजित पवार व राज्याचे सहकार व पणन मंत्री  बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.