आ.राहुल कुल यांच्या आवाहनाला दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचा प्रतिसाद, मदतीचा 2 लाख रुपयांचा धनादेश आमदारांकडे सुपूर्द



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून विविध उद्योग, सेवाभावी संस्था व अनेक दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनेही याकामी २ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून यावेळी  शिक्षक नेते व भीमा पाटसचे संचालक विकास शेलार,  अनिल नवले, गटविकास अधिकारी गणेश मोरे, गट शिक्षणाधिकारी वनवे असे मान्यवर उपस्थित होते. दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आलेल्या या मदतीसाठी सर्व शिक्षक बांधवांचे आमदार कुल यांनी यावेळी आभार मानले. कुल यांनी याबाबत माहिती देताना मी केलेल्या आवाहनाला विविध उद्योग, सेवाभावी संस्था व अनेक दानशूर व्यक्ती प्रतिसाद देत मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यामुळे सध्या दौंड तालुक्यात वास्तव्यास असलेल्या व ज्यांना कुठल्याही प्रकारे अन्न,धान्याची मदत मिळाली नाही अशा सुमारे ६००० हुन अधिक कुटुंबाना १५ दिवस पुरेल इतका किराणा आणि सामग्रीचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती शेवटी त्यांनी दिली.