दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट ७ चे ९५ जवान मुंबई येथे बंदोबस्त करुन नानवीज ( ता. दौंड ) येथील नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे आले होते. त्यांना या प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाइन करण्यात आले आहे असून या सर्व जवानांच्या घशातील स्ञावाचे नमुने राष्टीय विषाणुजन्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठविण्यात आले होते. मात्र यातील १५ जवान पाॕझीटीव्ह निघाले असल्याची माहीती ऊप जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय आधिक्षक डाॕ. संग्राम डांगे यांनी दिली आहे. यापूर्वी तालुक्यातील कोरोनाची संख्या दहा होती ती संख्या आता २५ वर गेली आहे.