थेऊरमध्ये चतुर्थी शांततेत, कोरोनामुळे दर्शनासाठी मंदिर बंदच



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)  थेऊर येेेथील चिंतामणी गणपती मंदिर हे अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र. येथे श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी प्रत्येक चतुर्थीस भाविकांची मोठी गर्दी होत असते परंतु गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण देशात लाॅकडाऊन असल्याने

धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आज नित्य दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या रांगा दिसत नव्हत्या की कोणी दर्शनसाठी येताना दिसत नव्हते. संपूर्ण परिसर शांत निर्मणुष्य होता.

प्रत्येक वेळी उन्हाळ्याची सुट्टी असताना हजारो भाविक चिंतामणी दर्शनासाठी येतात. आज रविवार असल्याने गर्दीचा उच्चांक अनुभवास आला असता परंतु वैश्विक महामारी कोरोनाचा कहर कमी होत नसल्याने प्रत्येकाच्या मनात भितीचे वातावरण आहे त्यामुळे कुणीही फिरकताना दिसत नव्हते. आज पहाटे मंदिराचे पुजारी किर्तीराज आगलावे यांनी महापुजा केली.तसेच चिंचवड देवस्थानच्या वतीने महापुजा करण्यात आली. परंतु दर्शनासाठी कोणासही परवानगी देण्यात आली नाही.