अल्काईल अमाईन्स या कंपनीने पांढरेवाडी गावात केले 300 अन्नधान्य कीट चे वितरण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(आलीम सय्यद)

 कोरोनाचा सामना करत असताना लॉकडाऊनमुळे रोजगाराचे साधन उपलब्ध होत नसल्याने गोर गरीब, कष्टकरी मजूर, हातावर पोट असलेल्या कामगारांचे आर्थिक हाल होऊन त्यांच्यासमोर प्रपंच चालविण्याचा मोठा प्रश्न उभा आहे. अनेक कुटुंबांना मदत मिळत नसल्याने अशा गरजू नागरिकांना मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. अशा नागरिकांना दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील अल्काईल अमाईन्स या कंपनीने पांढरेवाडी या गावात तीनशे अन्नधान्य कीटचे वितरण करण्यात आले आहे. दौंड तालुक्यात या कंपनीने एक हजारच्या अधिक किट वाटप केल्याचे कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले.  या किट मध्ये ५ किलो तांदूळ, ५ किलो आटा , १ किलो साखर, २०० ग्रॅम चहा पत्ती, १ किलो मीठ, १ किलो तूरडाळ, १ मसाला पॅकेट, १  तेल पुडा १ साबण अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.या तीनशे  किट चे वितरण ग्रामपंचायत कार्यालय पांढरेवाडी येथे कंपनीचे जनरल मॅनेजर राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे व्यवस्थापक सोमनाथ धुमाळ, बाप्पूसाहेब गावडे यांच्या हस्ते व ग्रामसेवक दीपक बोरावके, ग्रामपंचायत सदस्या पूजा अमोल कुलंगे  यांच्या  उपस्थितीमध्ये वाटप करण्यात आले. यावेळी  ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण, विशाल जगताप, नितीन जाधव , उद्योजक एस.पी. शितोळे, चंद्रकांत जाधव , श्रीकांत जाधव ,अभिमान निंबाळकर, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी कंपनीच्या  माध्यमातून गरजू कुटुंबाना अन्न धान्य दिल्याबद्दल ग्रामपंचायत पांढरेवाडी व या गरजू कुटुंबांनी कंपनीचे आभार मानले.