लोणीकाळभोर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)
कोरोना महामारीच्या अनुषंगाने सर्वत्र लाॅकडाऊन केल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरात अडकला यानंतर हातावर पोट असणाऱ्या अनेकांना दोनवेळच्या जेवणाची सोय होत नव्हती. अशा कष्टकरी मजुरांची उपासमारी होऊ नये यासाठी शासनाने काही उपाययोजना केल्या परंतु तरीही अनेकजण यापासून वंचित असायचे. यावर लोणीकाळभोर येथील अशा मजुरांना किमान एकवेळ तरी आपण भोजनाची व्यवस्था करावी असा विचार शिवसेनेचे जिल्हा संघटक रमेश भोसले, हेमंत हाडके व संतोष भोसले यांच्या मनात आला त्यानुसार त्यांनी काही मित्रांच्या सहकार्यातून दुसर्या दिवशी दोन हजार माणसांसाठी भोजणाची व्यवस्था केली. दररोज सायंकाळी घरपोच भोजनाची व्यवस्था केली जाऊ लागली परंतु लोणी काळभोर येथे एक कोरोना रुग्ण सापडल्याने घरपोच भोजनाची व्यवस्था थांबवण्यात आली.परंतु त्यानंतर ही भोजनाची पॅकेटस् अंबरनाथ भाजी मंडई चौकात सायंकाळी साडे सहा वाजल्यापासून वाटप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टंशिगसाठी चौकोन आखले असून प्रत्येक जण त्याची चोख अमलबजावणी करताना दिसत आहे. सध्या रोज बाराशे पॅकेटस् चे वाटप केले जात आहे यासाठी अनेकजण आपापल्या परीने योगदान देत आहेत.