थेऊर : सहकारनामा ऑनलाईन
संपूर्ण जगभरात कोरोना महामारीच्या संकटात मानवतेच्या सेवेत सलग्न बाबाजीच्या शिकवणूकीचे क्रियात्मक रुप देण्याचे अनोखे उदाहरण निरंकारी भक्तांकडुन पाहावयास मिळत आहे.
संपूर्ण जगभर पसरलेल्या निरंकारी परिवाराकडून संत निरंकारी मिशनचे दिवंगत सदगुरू बाबा हरदेवसिंह जी महाराज यांना समर्पन दिवसाच्या रुपात 13 मे रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरवर्षी 13 मे रोजी यांच्या स्मरणार्थ विशाल सतसंगच्या रुपाने श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला जातो परंतु यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून देण्यात आलल्या आदेशानुसार विशेष सतसंगाचे आयोजन न करता घरी बसुनच ऑनलाईन कार्यक्रमातून मिशनच्या वर्तमान सदगुरू माता सुदिक्षा जी यांचा पावन संदेश प्रसारित केला जात आहे. सदगुरू बाबा हरदेवसिंह जी महाराज यांनी संत निरंकारी मिशनची आध्यात्मिक प्रमुख म्हणून 36 वर्ष धुरा सांभाळली. चार वर्षांपूर्वी याच दिवशी त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग करून निराकार रूपात विलीन झाले. आपल्या काळात सदगुरू बाबाजी यांनी अथक परिश्रम करून आध्यात्मिक जनजागृतीदवारे मिशनचा सत्य प्रेम मानवता विश्व बंधुत्वाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवला त्याचबरोबर वैर, निंदा, नफरत, संकुचितपणा व भेदभाव यासारख्या दुर्भावना दूर करून मानवी मुल्ये वाढीस लावली आणि जगामध्ये प्रेम दया करूना शांतीसुखाचे वातावरण स्थापित व्हावे यासाठी संदेश दिला.
सामाजिक कार्यक्रम राबवून मिशनला पुढे नेण्याचे काम केले.यात रक्तदान, स्वच्छता अभियान, अयोग्य शिबीर, महिला सक्षमीकरण विभाग, व्यवसाय मार्गदर्शन केन्द्र आदी क्षेत्रात बाबाजींनी मोलाचा मार्गदर्शन केले. वैद्यकीय सेवा माफक दरात मिळावी म्हणून हेल्थ सिटी या म्हहत्वकाक्षी प्रकल्पाचाही प्रारंभ सुरू केला तसेच मिशनच्या सामाजिक कार्याला विस्तृत रूप प्रदान करण्यासाठी एप्रिल 2010 रोजी संत निरंकारी च्यारीटेबल फाऊंडेशनची स्थापना केली. असे अनेक म्हत्वकाक्षी उपक्रम बाबाजीच्या कार्यकाळामथे झाले तिच शिकवणूक घेऊन आज निरंकारी मिशनच्या वर्तमान सदगुरू माता सुदिक्षा जी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली सत्य प्रेम एकत्व विश्चबंधुत्त्वाची शिकवण जगभर पोहचवण्याचे काम केले जात आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रकारची सुरक्षात्मक काळजी घेत मानवतेच्या सेवेसाठी प्रेरीत करण्याचे काम सदगुरू माता सुदिक्षा जी महाराज आपल्या भक्तगनांना देत आहेत.या संकटात हजारो गरजु कुटूंबियांना राशन वाटप केले जात आहेत त्याचबरोबर विस्थापित मजुरांनाही मिशनच्या वतीने मदत केली जात आहे