खून’ : जमिनीच्या वादातून दौंड तालुक्यात पुतण्याने केला चुलत्याचा ‛खून’



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील भोसलेवाडी, उंडवडी येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्यासह दोन चुलत भावना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून यात चुलता जागीच ठार झाला असल्याची भयानक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोपट गारुडी आणि बापू गारुडी हे दोघे भाऊ असून यातील पोपट गारुडी यांच्या एका मुलाने बापू गारुडी आणि  त्यांच्या दोन मुलांना अगोदर अल्टो कार अंगावर घालून  जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नंतर लाकडे कापण्याची कट्टीने (कोयत्याचा प्रकार) चुलते बापू लक्ष्मण गारुडी व त्यांच्या दोन्ही मुलांवर जीवघेणा हल्ला केला यात बापू गारुडी हे जागीच ठार झाले तर त्यांची दोन मुले जखमी झाली आहेत. 

याबाबत आरोपी अमित पोपट गारुडी याने यवत पोलीस स्टेशमध्ये हजर होऊन पोलिसांना ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील तसेच दौंड उपविभागीय अधिकारी (IPS) ऐश्वर्या शर्मा यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली. आरोपीला यवत पोलिसांनी अटक केली असून याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.