मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारकडून जी मदत दिली जात आहे त्यावर भाजप चांगलीच आक्रमक होताना दिसत असून त्यांनी याबाबत चिंता व्यक्त करत राज्यपालांची भेट घेतली. यानंतर त्यांनी मिडियासमोर येताना माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने शेतकरी आणि बारा बलुतेदारांना इतर राज्यांप्रमाणे मदत द्यावी अशी जोरदार मागणी केली.
फडणवीस यांनी बोलताना राज्यातील शेतकरी सध्याच्या परिस्थितीमुळे अडचणीत सापडला आहे. शेतमाल खरेदीचे पैसे केंद्राकडून दिले जातात मात्र राज्य सरकारने शेतमालाच्या खरेदीची व्यवस्था केलेली नाही, हा माल खरेदी करण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली पाहिजे. तसेच राज्यातील बारा बलुतेदारांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे या परिस्थिमध्ये राज्य सरकारने केंद्र सरकार आणि इतर राज्य सरकारांप्रमाणेच राज्यातील शेतकरी आणि बारा बलुतेदारांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी करत अशाप्रकारचे पॅकेज जाहीर करण्यात न आलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे सांगून खिल्ली उडवली. आणि जसे शरद पवार यांनी आर्थिक पॅकेजबाबत केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. तशा पद्धतीचे एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावे असे आवाहन केले. आणि या परिस्थितीत जनतेच्या वेदना मांडल्या नाहीत तर जनतेला न्याय कसा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला. सरकार जनतेसाठी काही करत नसेल तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी दिला.