मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
संपूर्ण देश कोरोनाचा मुकाबला करत असताना आता राज्यात कोरोनावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
काल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या नियोजनावरून राज्य सरकारला धारेवर धरत पवार साहेबांनी जसे पंतप्रधानांना पत्र लिहिले तसे मुख्यमंत्र्यांनाही लिहणार का याबाबत प्रश्न उपस्थित केला होता त्यावर आता पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ‛शरद पवार यांचं पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल’ अशा शब्दांत प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी कोरोना विषाणूवरून उद्भवलेल्या परिस्थितीबाबत महाराष्ट्र बचाव आंदोलन करणार आहे. यासाठी फडणवीस राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली होती यानंतर फडणवीस मीडिया समोर आले होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं. राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरू आहे’, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. यानंतर रोहित पवार यांनी याचे उत्तर देताना आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर सरकार व मुख्यमंत्री साहेब काम करत आहेत. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल असे म्हणत साहेबांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचं पत्र पंतप्रधान मोदीजींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो! याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल, असं मला वाटतं अशा पद्धतीने फडणवीसांवर निशाणा साधला