मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
संचारबंदीमुळे गोर गरीब जनता, कामगार, कष्टकरी,मजूर, हातावर पोट असलेल्या छोट्या मोठया विक्रेत्यांचा समस्यांची दखल घेऊन शासनाने लवकरात लवकर विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेकडे केली.
आज संपूर्ण देश व महाराष्ट्र कोरोना विषाणूच्या संक्रमणाशी सामना करत आहे, कोरोना विरुद्ध या लढाई मध्ये समाजातील प्रत्येक घटक आपले योगदान देत आहे, प्रशासनाच्या बरोबरीनेच, समाजातील सर्व घटक आपले कर्तव्य अतिशय चांगल्या प्रकारे पाडत असतानाच या महामारी मुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे गोर गरीब जनता, कामगार, कष्टकरी, मजूर, हातावर पोट असलेल्या छोट्या मोठया विक्रेत्यांचा समस्यांची दखल घेऊन शासनाने लवकरात लवकर विशेष पॅकेज जाहीर करावे तसेच प्रशासन आणि शासन यामध्ये योग्य समन्वय साधत योग्य निर्णय घेण्यात यावे, पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभागावरील ताण कमी करावा, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे अशी विनंती आमदार राहुल कुल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेऊन केली. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात स्थानिक पातळीवर सुरु असलेल्या विविध उपाययोजनांसंदर्भांत माहिती दिली. तसेच राज्यपाल कोश्यारी यांचेशी वन, जलसंपदा, अवयवदान आदी विषयांतील समस्यांवर देखील सकारात्मक चर्चा झाली प्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक -निं बाळकर, आमदार मा. जयकुमार गोरे उपस्थित होते.