केडगाव परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन


दौंड तालुक्यातील केडगाव आणि परिसरामध्ये मुसळधार पावसाने आज हजेरी लावली असून आज दिवसभर केडगाव परिसरामध्ये उकाडा जाणवत होता. सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे मात्र या उकाड्यावर मात केल्याने हवेमध्ये सर्वत्र गारवा पसरल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बल वीस मिनिटे चाललेल्या पावसामुळे केडगावचा परिसर न्हाऊन निघाला आहे. मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी चांगला पाऊस व्हावा अशी आशा शेतकरी वर्ग बाळगून आहेत तर फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या जिरायत भागातील शेतकऱ्यांच्याही आशा आता पल्लवित झाल्या आहेत.