दौंडकरांनो सावधान : वादळी वाऱ्याचा वेग वाढत चाललाय, असा करा स्वतःचा बचाव



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

समुद्र किनारी निर्माण झालेले ‛निसर्ग’ वादळ हे आपले रौद्ररूप धारण करत असून सकाळी 11 वाजल्यापासून दौंड तालुक्यात जोराचा वारा वाहू लागला आहे.

अरबी समुद्रात सुरू झालेलं ‛निसर्ग’ चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकू लागले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह इतर समुद्र किनारपट्टीवरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्री वादळ दुर्लक्ष करण्याजोगे नसून नागरिकांनी घरातंच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबण्याचे आवाहन  शासनाकडून करण्यात येत आहे. पुणे जिल्हा आणि त्यातील दौंड तालुका हा जरी समुद्र किनारपट्टी पासून दूर असला तरी चक्रीवादळा सोबत वाहणारे वारे हे कच्ची घरे, झाडे, झोपड्या यांना लक्ष करू शकते त्यामुळे अनेक ठिकाणी जिवित, वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो पक्क्या घरांमध्ये आसरा घेण्याची गरज असून जो पर्यंत हे वादळ शमत नाही तोपर्यंत घराबाहेर पडण्याचे टाळून या चक्रीवादळापासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे बनले आहे.