लॉकडाउन’मध्ये सुट मिळताच पुणे ग्रामीणमध्ये चालणाऱ्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, मोठ्या प्रमाणावर वाहने, गोमांस आणि जिवंत जनावरे ताब्यात.



पुणे : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी बारामती क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि जवान यांना इंदापूर येथील कत्तलखाना येथे अवैधरित्या गोवंश जनावरे यांची कत्तल करून विक्री करत असलेबाबत आणि त्यावर रेड करणेबाबत आदेश दिले होते. त्यावरून बारामती क्राईम ब्रांच चे अधिकारी आणि जवान यांनी बारामती शहर, बारामती तालुका आणि इंदापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी, पोलीस जवान यांच्या मदतीने सदर ठिकाणी गोपनियरीत्या जाऊन बेकायदेशीरपणे चालणाऱ्या जनावर कत्तलखान्यावर अचानक छापा घातला असता सदर ठिकाणी आरोपी हे अवैधरित्या गोवंशाची कत्तल करत असताना मिळून आले. 

सदर ठिकाणाहून

एकूण 6 वाहने,

3 Eicher मोठे टेम्पो,

3 Pick up त्यामध्ये 98 जिवंत गोवंश जनावरे, इतर ठिकाणी 3 देशी गायी, 1 जर्षि बैल, 1 म्हैस अशी एकूण 103 गोवंश जनावरे ताब्यात घेतली. सदर ठिकाणी 3300 किलो कापलेले मांस मिळून आले आहे. तर 14,90,000 रु किमतीची वाहने व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या छाप्यामध्ये  1) कलीम कयूम कुरेशी राहणार कुरेशी गल्ली तालुका इंदापूर जिल्हा पुणे 2) वाहिद शब्बीर कुरेशी राहणार समता नगर अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर 3) आस्कंन नयुम कुरेशी राहणार कासार पट्टा इंदापूर 4) रशीद बेपारी राहणार कुरेशी गल्ली तालुका इंदापूर जिल्हा पुणे 5) जमीर बेपारी राहणार कुरेशी कल्ली तालुका इंदापूर जिल्हा पुणे 6) कासम कुरेशी राहणार पान गल्ली बारामती 7) जमीर कुरेशी राहणार बारामती जिल्हा पुणे 8) समीर शबरी सौदागर राहणार पंचशील नगर अकलूज

9) mh 42 m 6759 पिकअप टेम्पो वरील चालक, 10) mh 42 b 7527 आयशर टेम्पो वरील चालक, 11) mh 4 b 7527 आयशर टेम्पो चा मालक, 12) mh 13 cu 2014 पिकअप वरील चालक, 13) mh 13 cu पिकअप  गाडीचा  मालक, 14) mh 42 m 6409 या गाडीचा चालक, 15) mh 42 m 6409 या गाडीचा मालक, 16) mh 11 al 2408 आयशर टेम्पो वरील चालक, 17) MH 11 al 2408 आयशर टेम्पोचा मालक यांचे विरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात भा द वि 429, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5(अ)(ब)(क) तसेच पशु क्रूरता अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा.संदीप पाटील,  (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, इंदापूर पोलीस स्टेशनचे PI नारायण सारंगकर, बारामती शहर पो स्टे चे API श्री सचिन शिंदे, बारामती तालुका पो स्टे चे महेश विधाते, इंदापूर पो स्टे चे API गणेश लोकरे, बिराप्पा लातुरे

बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, चालक भाऊसाहेब मोरे आरसीपी पथकातील 12 पोलिस जवान यांनी केली असून बारामती तालुका पोलिस स्टेशनचे  पोलीस जवान मंगेश कांबळे, अमोल नरुटे, पांडुरंग बागल, बारामती शहरचे नाथा जगताप, अविनाश दराडे, तुषार चव्हाण, आमन शेख, इंदापूर पो स्टे चे जगदीश चौधर, गणेश झरेकर, अमोल गार्डि, विनोद मोरे, विक्रम जाधव, वैभव मदने, गोकुळ हिप्परकर, काका पाटोळे, विक्रम जमादार यांनी या कारवाई कामी मदत केली.