विविध मागण्यांसाठी नाभिक मंडळातर्फे आंदोलन



पुणे : सहकारनामा ऑनलाईन


आज बुधवारी दि.10 जून रोजी पुण्यातील सिहंगड रोड येथे पुणे शहर नाभिक मंडळ तर्फे “माझे सलून दुकान, माझी मागणी असे फलक हातामध्ये घेऊन कोरोनाच्या काळात सलून दुकान पुन्हा उघडण्यासाठी नाभिक आणि सलून दुकानदारांनी आंदोलन केले. कोरोना कोविड १९ मध्ये गेले तीन महिण्यापासून सलून आणि कटिंग चे दुकान बंद आहेत. त्यामुळे दुकानात काम करणारे कारागीर आणि मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार सरकारला  मागण्या करून देखील सलूनची दुकाने बंद आहेत. या साठी आज सिहंगड परिसर, कोथरूड पार्वती विभागातील दुकानदार आणि कारागिरांनी  “माझे सलून दुकान, माझी मागणी ” असे फलक हातामध्ये घेऊन आंदोलन केले. 

दुकान सुरु करण्यात यावीत, कोरोना मुळे आमचे कुटुंब संकटात आले आहे, कारागीर बेरोजगार आहेत, परराज्यांतील कामगारांचे काम गेले आहे, आमच्या विविध मागण्या आहेत असे मत महेश सांगला  ( पुणे शहर नाभिक महामंडळ अध्यक्ष ) यांनी यावेळी व्यक्त केले.

पुणे शहर नाभिक मंडळ यांच्यावतीने खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या.

१) मागिल २ महिने व पुढील काही महिन्याचे नाभिकांस/सलून व्यवसायीकांस रु.१५,०००/- आर्थिक सहाय्यता निधी प्रत्येकास मिळावा.

२) कोव्हिड १९ चे संसर्गासाठी नाभिकांस/सलून व्यवसायीकांस रु.५ लाख आरोग्य सुरक्षा कवच व रु.२५ लाख जीवन सुरक्षा कवच हे शासनाने विमा संरक्षण कधी मिळणार.

३) सलून व्यवसाय हा सेवा व्यवसायात येत असल्यामुळे शासनाने नाभिकांस/सलून व्यवसायीकांस पीपीई किट, हँन्ड सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज, सोडीयम 

हायड्रोक्लोरायीड,मास्क,फेस शिल्ड हे नाभिकाचे व गिऱ्हाईकाचे सुरक्षितते साठी  मोफत द्यावे.

४) शासनाने नियम व अटीसह सलून व्यवसाय सुरु करणे सर्शत परवानगी कधी पर्यत मिळेल.

५) सलून व्यवसाय बंद आहे त्या काळातील (लॉकडाऊन काळातील) सलून व्यवसायीकांचे लाईट बिल माफ होईल का?

६) सलून व्यवसाय बंद आहे त्या काळातील (लॉकडाऊन काळातील) दुकान भाडे,घर भाडे माफ करणेसाठी शासनाने शासकीय आदेश काढून नाभिकांस/सलून व्यवसायीकांस दिलासा द्यावा.