दौंड तालुक्यातील तोतया आर्मी आॅफीसर ताब्यात- LCB पुणे ग्रामीण यांची खडकी येथे कारवाई



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील खडकी येथे लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्यास पुणे ग्रामीण पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

याबाबत पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्यामुळे त्यांनी मौजे खडकी गावचे हद्दीत प्रषांत विजय काळे, (रा. खडकी, ता. दौंड जि. पुणे) हा स्वतः भारतीय लष्करात कोणत्याही पदावर नेमणुकीस नसतानाही तो भारतीय लष्करात 14 सिख रेजिमेंटचा मेजर असल्याची बतावणी करीत आहे. अशी गोपनीय बातमी मिळाल्याने त्याबाबत खातरजमा करण्याकरीता पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि.दत्तात्रय गुंड, पोहवा रौफ इनामदार, उमाकांत कंुजीर, सचिन गायकवाड, निलेष कदम, महेष गायकवाड, रविराज कोकरे, अनिल काळे, पोना गुरूनाथ गायकवाड, सुभाष राऊत, चंद्रकांत जाधव, ज्ञानदेव क्षिरसागर, पोकाॅ अक्षय जावळे यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहीतीप्रमाणे खातरजमा करण्याकरीता रवाना केले होते.

सदर पथकाने जिल्हा परिषद शाळा खडकी समोरील रोडवरून बातमीचे वर्णनाप्रमाणे सापळा लावून अंगात इंडीयन आर्मी लोगो असलेला खाकी रंगाचा टी शर्ट घातलेला इसम प्रशांत विजय काळे, उर्फ रोबोस्ट आण्णा, वय 27 वर्षे रा. खडकी, ता. दौंड जि. पुणे यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने आपले मित्रांजवळ स्वतः लोकसेवक असल्याची बतावणी करत असल्याचे व  त्यासाठी भारतीय सेना दलाचे विविध पदके, चिन्हे, सेनादलातील नियुक्तीचे पत्र असे खडकी येथील काळेवाडा येथील रहाते घरातील कपाटातून भारतीय सेना दलाचे नियुक्ती पत्र, सेना दलात विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर दिली जाणारी पदके, सन्मानचिन्ह, लोगो, भारतीय सेना दलाची कपडे, मोबाईल फोन असा कि.रू. 9,500/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे त्यामुळे त्याच्या विरोधात सचिन मोहन गायकवाड, पो.हवा. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलीस स्टेषन येथे गु.रजि.नं. 321/2020, भा.दं.वि.कलम 419,170,465 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. महाडीक, दौंड पोलीस स्टेषन हे करीत आहेत.