police action in vehicle park roadside – रस्त्यामध्ये धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या 7 वाहन चालकांवर यवत पोलिसांकडून गुन्हे दाखल



|सहकारनामा|

दौंड : महामार्ग आणि रहदारीच्या मुख्य रस्त्यांवर मोठी वाहने उभी करून अपघातास निमंत्रण देणाऱ्या 7 वाहनचालकांवर आणि वाहनांवर यवत पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यवत, पाटस आणि अन्य ठिकाणांवर इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, जीवितहानी, वित्तहानी होईल तसेच रस्त्याच्या रहदारीस अडथळा निर्माण होईल अश्या धोकादायक स्थितीमध्ये वाहने उभी करणाऱ्या सोमनाथ संजय पाटील (गोठाने, धुळे) महेश काळूराम दोरगे (यवत, दौंड) शहाजी शांताराम चव्हाण (बोरीभडक, दौंड) रोहिदास सुरेश शिंदे (कानगाव, दौंड) अकबर शमशुद्दीन काझी (रामवाडी, करमाळा) आनंद जळबा मोरे (पाटस, दौंड) परशुराम जगन्नाथ बरकडे ( कात्रज, पुणे) यांच्यावर यवत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

यवत चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत, पाटस पोलिसांनी हि कामगिरी केली आहे.