दौंड तालुका कोरोनामुक्ती साठी सर्वोतोपरी प्रयत्न करू : आमदार अॅड. राहुल कुल



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आमदार अॅड. राहुल कुल यांनी दि. 12 रोजी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले की, दौंड शहरासह तालुक्याला आपल्याला कोरोमुक्त करायचे असून, शहरातील झोपडपट्टी व प्रतिबंधक क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक घरांमध्ये सॅनीटायझर हे मी माझ्यावतीने देणार आहे. दौंड शहरात सुरू असणारे कोविड सेंटर मधील जागा  कमी पडल्यास यवत येथील ट्रॉमा केअर सेंटर मध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी शहरातील बाजारपेठेत सोशल डिस्टंसिंगचे पालन होत आहे की नाही याबाबत पोलिसांनी लक्ष देऊन सोशल डिस्टंसिंग कटाक्षाने पाळवा याबाबत पोलिसांना  सूचना  दिल्या .दौंड रेल्वे स्थानकात सध्या आठ गाड्या थांबून पुढे जात आहेत . या गाड्यांमधून रात्री व पहाटे काही प्रवासी उतरत असतात या प्रवाशांची कुठल्याही प्रकारची तपासणी  प्रशासनातर्फे केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे . यावर तहसीलदार संजय पाटील यांना आमदार कुल यांनी सूचना देत तात्काळ पाहणी करून येणाऱ्या प्रवाशांची कशा पद्धतीने तपासणी होईल याची काळजी घेण्याच्या सूचना आमदार कुल यांनी दिल्या, तसेच नगरपालिकेने प्रत्येक घरात मास्क देण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना नगरपालिका प्रशासनाला त्यांनी केली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी  शहरात  सुरू असणाऱ्या उपाययोजनेबाबत माहिती देत ज्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे त्या ठिकाणी फवारणी सुरू असल्याचे सांगत यापुढे शहारात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या बैठकीस तहसीलदार संजय पाटील, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक राजगे , नगराध्यक्षा शितल कटारिया व  नगरसेवक उपस्थित होते.