केडगावमध्ये आणखी एका डॉक्टरांना कोरोनाची लागण,‛कोरोना योद्धे’ आले कोरोनाच्या रडारवर



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव येथे पुन्हा एका प्रसिद्ध खाजगी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती खुद्द त्या डॉक्टरांनीच ‛सहकारनामा’शी फोनवरून बोलताना दिली आहे.

 या प्रकारामुळे कोरोना योद्धेच आता कोरोनाच्या रडारवर आल्याचे दिसून येत असून सर्वसामान्य जनतेसाठी कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टरांनाच आता कोरोनाची लागण होत असल्याने कोरोनाने आता कोरोना योद्ध्यांनाच आपले शिकार करण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र केडगावमध्ये पाहायला मिळत आहे.

केडगाव बाजारपेठ ही खूप अर्थीक दृष्ट्या खूप मोठी असून केडगावला बाहेरून येणाऱ्यांची संख्याही खुप मोठी आहे. यातूनच अनेक रुग्ण आणि नागरिक हे येथील प्रशस्त दवाखान्यांमध्ये येत असतात या रुग्णांना तापसणाऱ्या डॉक्टरांना अक्षरशः आपला जीव मुठीत धरून हे काम करावे लागते आणि यातूनच मग ते अश्या प्रकारे या विषाणूने बाधित होत असल्याचे समोर येत आहे.