केडगाव-बोरीपारधी’ मध्ये अजून दोघांना ‛कोरोनाची’ लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव येथे अजून दोन जणांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असून यामुळे आता केडगाव-बोरीपारधीच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

याबाबतची अधिकृत माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली असून दोघेही कोरोना रुग्ण हे केडगावचे कोरोना बाधित डॉक्टर व बोरीपारधी येथील रिक्षा चालकांचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन सोशल डिस्टन्स पाळावे, हात वारंवार साबणाने धुवावे व सॅनिटायझर चा वापर करावा असे आवाहन दौंडचे तहसीलदार संजय पाटील तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी सहकारनामा च्या माध्यमातून केले आहे