दौंड, दि.24 जून : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील केडगाव येथे पुन्हा एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी सहकारनामा’शी बोलताना दिली.
कोरोना बाधित रुग्ण हा एका कोरोना बाधित व्यक्तीचा पुतण्या असल्याची माहिती मिळत असून त्यामुळे आता केडगावमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6 झाली आहे.
केडगाव परिसरामध्ये एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांनाही त्याची लागण झाली होती. केडगावमध्ये दोन्ही प्रसिद्ध डॉक्टरच कोरोनाचे शिकार झाल्याने ते लवकरात लवकर निगेटिव्ह व्हावेत म्हणून केडगावकर प्रार्थना करत आहेत.