केडगावमध्ये पुन्हा ‛दोघे’ कोरोना पॉझिटिव्ह, एकाच कुटुंबातील कोरोना बाधितांची संख्या ‛सात’, तर केडगावच्या एकूण कोरोना बाधितांची संख्या झाली ‛आठ’



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव-बोरीपार्धी येथील 31 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार त्या एकाच कुटुंबातील पुन्हा ‛दोघे’जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने केडगावकारांच्या आनंदावर विर्जन पडले आहार. त्यामुळे आता केडगावमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 झाली आहे असून एकाच कुटुंबातील कोरोना बाधितांची संख्या ‛सात’वर पोहोचली आहे. याबाबतची  माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी सहकारनामा’शी बोलताना दिली.

केडगाव येथे एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण केडगावमध्ये खळबळ माजली होती. या सर्व घडामोडी पाहता तालुक्याचे आमदार राहुल कुल, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे, यवत येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.इरवाडकर यांनी नागरिकांना भीती न बाळगता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

केडगाव येथे कोरोना बाधित झालेल्या त्या पहिल्या डॉक्टरांची तब्येत व्यवस्थित असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र एकाच कुटुंबात 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकाच कुटुंबियांची कोरोना चेन अजून थांबण्याचे नाव घेत नसल्याने केडगावकारांच्या चिंता वाढल्या आहेत.